Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमअंजाळा घाटात दुचाकी घसरल्याने एकाचा मृत्यू

अंजाळा घाटात दुचाकी घसरल्याने एकाचा मृत्यू

यावल/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- यावल तालुक्यातील अंजाळा घाटात पहिलवान ढाबाजवळ दुचाकी घसरून एक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र सुभराम बारेला (वय २०, रा जामुनझ-या ता. यावल) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, यावलकडून भुसावळकडे जितेंद्र बारेला आणि राजू रूपसिंग पावरा (वय २०.रा. जमूनझिया) हे जात असताना अंजाळा घाटात त्यांची हिरो पॅशन दुचाकी क्र. एमएच १९ ईडी ५२८५ ही मोटारसायकल रस्त्यावरून जोरात घसरली. आणि दोघेही खाली पडले. त्यात जितेंद्र सुभराम बारेला हा मयत झाला. तर राजू पावरा याचे झालेल्या दुखापतीस आणि दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनिरी. सुनिल मोरे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या