Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावअंजाळे येथे ह.भ.प. धनराज महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त द्राक्षेतुला ,अनेक कार्यक्रम

अंजाळे येथे ह.भ.प. धनराज महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त द्राक्षेतुला ,अनेक कार्यक्रम

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव / नेहा राणे / पोलीस दक्षता लाईव्ह:- यावल तालुक्यातील अंजाळे येथील वै.ह. भ. प. संत जगन्नाथ महाराज संस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प. धनराज महाराज यांच्या वाढदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.यावल तालुक्यातील अंजाळे येथील वै.ह.भ. प. संत जगन्नाथ महाराज संस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प. धनराज महाराज यांच्या वाढदिनानिमित्त आज रविवार १६ एप्रिल रोजी द्राक्षे तुला समारंभाचे आयोजन सायंकाळी करण्यात आले आहे.

यानिमित्त अल्पपरिचय….
ह. भ. प. धनराज महाराज ऊर्फ संदीप गोपाळ चौधरी महाराज यांचा जन्म रावेर तालुक्यातील निंभोरा स्टेशन या गावी १६ एप्रिल १९८७ रोजी झाला. त्यांच्या घराण्यात संत परंपरेचे वलय असल्यामुळे धनराज महाराज यांना बालपणापासून महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरेचा आशिर्वाद लाभला. त्यामुळे शालेय जीवनापासून वयाच्या १० व्या वर्षीपासूनच हभप धनराज महाराज यांना संतांच्या आशिर्वादाने कीर्तन, प्रवचन, भजन, भारुडे आदी विषयांकडे ओढ लागली. त्यामुळे ते वयाच्या दहाव्या वर्षापासूनच संत परंपरेत तल्लीन होत असत. त्यांचे शिक्षण निंभोरा येथील न्यू इंग्लिस मध्ये झाले आहे, ते १९९७ पासून वारकरी संप्रदाय तथा संत वारकरी विषयाकडे वळले. वारकरी वलयात काम करीत असतांना विठ्ठल रखुमाई कृपेने ह. भ. प. धनराज महाराज हे २००१ पासून वै. ह. भ. प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या पायी वारीमध्ये जावू लागले. त्यांनंतर २०१३ मध्ये त्यांना वै. ह. भ. प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांचे उत्तराधिकारी वै. ह. भ.प. एकनाथ महाराज खडसे, भुसावळकर यांच्यानंतर गादीधीपती तथा अंजाळे संस्थानचे उत्तराधिकारी यजमान पद त्यांना २०१३ मध्ये मिळाले. त्यांच्या कीर्तन सेवेपासून आज वर्षाकाठी त्यांच्याकडून २५० च्या वर कीर्तन, प्रवचन सेवा दिली जात आहे.
अशा संत सेवा वारकरी संप्रदायात आजमितीस ह. भ. प. धनराज महाराज यांच्याकडून कीर्तन सेवा कार्यकाळात शेकडो लोक त्यांचे शिष्य तथा अनुयायी होत असून, हजारो लोक त्यांच्या कृपाआशिर्वादाने व्यसनाधिनतेकडून संत वारकरी संप्रदायाकडे वळत आहेत हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष नमूद करावेसे वाटते.
यासाठी हभप महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज (फैजपूर), हभप रवींद्र महाराज हरणे (मुक्ताईनगर), हभप भरत महाराज (झेंडूजी महाराज संस्थान, बेळी), हभप रमेश महाराज ( मुकुंद महाराज संस्थान, आडविहिर), हभप दुर्गादास महाराज ( चिनावल), हभप तोताराम महाराज ( गाडेगाव) आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजेंद्र राणे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या