पुणे/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पुण्यात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे.पुण्यातील तरुणांची पतंग उडवण्याची हौस एका डॉक्टर तरुणीच्या जीवावर चांगलीच बेतली.या तरुणांच्या पतंग उडवण्याच्या हौसेमुळे तरुणीला आपला जीव गमवावा लागला. पतंग उडवण्यासाठी वापरला गेलेला मांजादोरा हा डॉक्टर तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. मांजाच्या दोऱ्याने गळा कापला गेल्यामुळे 26 वर्षीय डॉक्टर तरुणीचा करून अंत झाला. रविवारी सायंकाळी सात-साडेसातच्या सुमारास नाशिक फाटा या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील मृत्यूमुखी पावलेली डॉक्टर तरुणी कृपाली निकम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,डॉक्टर कृपाली निकम ही आपल्या मैत्रिणीला घेऊन रेल्वे स्टेशनवर सोडवायला जात होती. डॉक्टर कृपाली निकम या मैत्रिणीला घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मित्राची एक्टिवा ही गाडी घेऊन जात होत्या. पिंपळे सौदागर या ठिकाणाहून भोसरीकडे जात असताना नाशिक फाटा या परिसरात उड्डाण पुलावर पतंग उडवण्यासाठी वापरातील येणारा मांजाचा दोरा लटकत होता. गाडीवरून जात असताना कृपाली यांना हा दोरा दिसला नाही. त्यामुळे त्यांच्या गळ्याला हा दोरा लागला.गळ्याला खूप मोठा काप बसला.दोरा गळ्याला लागल्यामुळे कृपया यांचा गळा चिरला गेला.रक्त येऊ लागले, कालांतराने परत त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. जवळच संत ज्ञानेश्वर रुग्णालयात कृपाली निकम यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार चालू करण्या अगोदरच डॉ. निकम यांचा मृत्यू ओढवला असे डॉक्टरांनी सांगितले ,दरम्यान या घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे.