Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने लांबविले.... फलाटावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने लांबविले…. फलाटावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

अमळनेर/धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात सर्वच ठिकाणी चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.अमळनेर ते भुसावळ दरम्यान अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे 34 हजार 385 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी अमळनेर लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखलकरण्यात आलेला आहे.

याघटनेबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील इस्लामपुरा जवळील जपान जीन जवळ राहणारे मोहम्मद शोएब शेख आपल्या बहिणीसह अमरावती एक्सप्रेसने जात असताना स्थानकावर गाडी आली असता घाई गडबडीत चढताना चोरट्याने त्यांच्या बहिणीकडे असलेल्या पर्स मधून सहाशे रुपये रोख आणि सोन्याच्या दागिने असा सुमारे
34 हजार 385 रुपयांचा ऐवज चोरून नेले आहेत. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच मोहम्मद शेख यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे नंदूरबार यांच्याकडे दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या आठवड्यात सुद्धा रेल्वे फलाटावर चोरीची घटना घडलेली आहे. दरम्यान सर्वच रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. मात्र अमळनेर येथील रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याने चोरटे याचा जास्त फायदा घेत रेल्वे प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारत आहेत. रेल्वे फलाटावर काही गुंड प्रवृत्तीचे व टारगट तरुण अधून मधून फिरकत असतात.याकडे जीआरपी ,आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांचे दुर्लक्ष असते अशीही काही प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ अमळनेर स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रवासांचे सुरक्षितता जोपासावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या