अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर शहरातील अग्निशमन दलाची इमारतीला आग लागल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली. त्यात अग्निशमन दलाच्या इमारतीला आग लागून आरोग्य विभागाचे कागदपत्र जळाले आहेत.
नितीन खैरनार, फारूख शेख, उस्मान शेख, दीपक बिन्हाडे या कर्मचाऱ्यांनी आग विझवली. सुदैवाने आग लागल्याचे लवकर लक्षात आले अन्यथा वरच्या मजल्यावर राहणाऱ्या अग्निशमन दलाचे कर्मचारी धोक्यात आले असते. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या आदेशाने आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण यांनी अमळनेर पोलिसात खबर दिल्यावरून आगीची नोंद करण्यात आली आहे. तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी पडली. लोणतांडा येथील घराच्या छतावर आग लागल्याने आधी घरातील लोकांना काहीच समजले नाही. आग मोठी झाल्यावर अचानक धावपळ सुरु झाली आणि घरातील लोक बाहेर पडले. चारा आणि घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे. सुमारे ४० ते ५० हजाराचे साहित्य जळून खाक झाले आहे. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.गावकऱ्यांनी सुद्धा मदत केली.