अमळनेर/धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीचे समूळ कमी करण्यासाठी पोलीस विभाग सतर्क झाला आहे.पोलिसांनी शहरात दंगली आणि तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करून त्याची पुणे येथील येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विशाल दशरथ चौधरी (वय २७) असे या आरोपीचे नाव आहे. २०२३ या वर्षात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाच एमपीडीएच्या कारवाई अमळनेरात झाल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी प्रतिनिधीस दिली.
अमळनेर शहरातील भोईवाडा भागातील विशाल चौधरी हा शहरातील विविध दंगलीत सहभागी होऊन दहशत निर्माण करत होता.त्याने मोठ्या प्रमाणात त्या परिसरात दहशत निर्माण केली होती. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जबरी लूट, तलवार घेऊन दहशत निर्माण करणे असे सहा दखलपात्र गुन्हे तर एक अदखलपात्र गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. विशाल विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याच्या वर्तणुकीत बदल झाला नव्हता. यासाठी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी कॉन्स्टेबल किशोर पाटील व सिद्धांत शिसोदे यांच्या मदतीने एमपीडीए प्रस्ताव तयार केला. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांचे मार्गदर्शन घेऊन प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. प्रस्तावाची मंजुरी मिळताच पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस दीपक माळी, रवींद्र पाटील, शरद पाटील यांनी त्याला १ ऑगस्ट रोजी सकाळी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे,
कॉन्स्टेबल कैलास शिंदे, घनश्याम पवार, सुनील पाटील, योगेश पाटील, जितेंद्र निकुंभे यांनी आरोपी विशाल चौधरी याला विशेष वाहनाने पुणे येथील येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यासाठी नेले.जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे.

