Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावअमळनेरच्या सुपुत्राकडे अबुधाबीची मोठी जबाबदारी; अभिमानाची बाब

अमळनेरच्या सुपुत्राकडे अबुधाबीची मोठी जबाबदारी; अभिमानाची बाब

अमळनेर/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जगभरात महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर डंका वाजविला आहे.गेल्या ३० वर्षांपासून आखाती भागातील अबुधाबी शहरात कार्यरत असणार्‍या महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्षपदाची धुरा अमळनेरचे भूषण चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

जगभरात अनेक देशात कर्तृत्व गाजवितानाच मराठी माणसांकडून मराठमोळी नाळ जोपासलेली जावी, यासाठी जगभरात महाराष्ट्र मंडळाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात.या व्यासपीठावर अनेकांना महत्वपूर्ण संधी उपलब्ध करण्यात येत असते. यात प्रामुख्याने अबुधाबी शहराचा समावेश आहे. यासाठी दरवर्षी नवीन सदस्यांकडे मंडळाची जबाबदारी सोपविण्यात येते. त्यानुसार या वर्षाची जबाबदारी वार्षिक सर्वसाधारण सभेचे निश्चित करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सुपुत्राकडे अबुधाबी शहराची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुंबई जुहू येथील हॉटेल नोव्हटेलच्या सभागृहात झालेल्या सभेत 2023 -2024 या वर्षांची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात नूतन अध्यक्षपदी अमळनेरचे सुपुत्र भूषण चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर सचिवपदी कोमल तावडे, खजिनदार स्वाती भोळे यांची निवड झाली. या कार्यकारिणीत दर्पण सावंत, संजीव गुरव, संजय चौलकर, अनिल वायकर, प्रसाद देशपांडे, डॉ. प्रसाद बारटक्के, गीता माहीमकर, निहाल मांडके, अक्षय फणसे यांची निवड झाली. मंडळाच्या आर्थिक लेखा परीक्षक म्हणून प्रतीक्षा मुनीश्वर काम पाहणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या