Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअमळनेरात आज शाळा,कॉलेज, व्यापारी प्रतिष्ठाने,बाजार स्वयंस्फूर्तीने बंद; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

अमळनेरात आज शाळा,कॉलेज, व्यापारी प्रतिष्ठाने,बाजार स्वयंस्फूर्तीने बंद; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

अमळनेर/धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर येथे काही दिवसांपूर्वी दोन गटात दंगल उसळली होती.दरम्यान दोन दिवस शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. दंगलीतील आरोपीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी गुरुवारी दि.15 रोजी अमळनेर शहर स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय विविध आस्थापनांनी घेतला आहे. यास नागरिकांसह व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीतील संशयित आरोपीचा उपचारादरम्यान जळगाव येथे मृत्यू झाल्याने विविध अफवांना पूर येवून नागरिकांमध्ये घबराट पसरली. अमळनेर शहरातील विविध भागात वेगवेगळ्या चर्चेला उत आला होता.तर काही संवेदनशील भागात पोलीस तैनात होते, शांतता ठेवण्याचे आवाहन करण्यात येत होते. काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झालेले दिसून आले. तसेच बाजारपेठेत दगडफेक झाल्याची अफवा पसरल्याने दुकानदारांनी आपली दुकाने पटापट बंद केली. त्यामुळे नागरिकांनी पळापळ सुरू केली.या प्रकारामुळे काही व्यावसायिकांचे किरकोळ नुकसानही झाले आहे.

अमळनेर तालुक्यात विविध अफवांना यामुळे उत आला होता. त्यामुळे शहरात शांतता प्रस्थापित व्हावी, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून अनेक शाळा,महाविद्यालये, नागरिक, व्यापारी प्रतिष्ठाने यांनी दिनांक १५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक खाजगी शाळांनी ही आज सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी यासाठी पूर्णतः सहकार्य करावे आणि विनाकारण गावात फिरू नये, अफवा पसरवू नये, शांतता कायम ठेवावी, असे आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने केले आहे.पोलीस दक्षताच्या प्रतिनिधीने शहरातील काही भागात फेरफटका मारला असता शहरात शांतता दिसून आली तर काही ठिकाणी पोलीस तैनात असलेले दिसून आले.नागरिक स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या