Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमअमळनेरात दोन खुनानंतर हाफ मर्डर.. ! दोन जणांना घेतले ताब्यात...

अमळनेरात दोन खुनानंतर हाफ मर्डर.. ! दोन जणांना घेतले ताब्यात…

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

अमळनेर/धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- नाशिक येथून देवदर्शन करून आल्यावर अमळनेर शहरात एका हॉटेलमध्ये जेवण करून बिल देण्याच्या वादातून दोन मित्रांवर एकाने चाकू हल्ला चढविल्याची खळबळजनक घटना काल रात्री घडली.जेवण झाल्यानंतर किरकोळ कारणावरून हमरीतुमरी वर वाद झाला .यातील संशयिताच्या पोलिसांनी नाशिक येथून मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या तीन-चार दिवसात दोन तरुणाचा खून आणि आता हाफ मर्डरमुळे समाजमन सुन्न झाले आहे.या प्रकारामुळे पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. अमळनेर शहर परिसरात गुन्हेगारांनी डोके वर काढले असून जिल्हा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे बोलले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ऋषिकेश श्याम सोनार (22, रा. पैलाड अमळनेर), तेजस रवींद्र पाटील (22, रा. मिल कंपाऊंड) हे नाशिक जवळील एका देवीचे दर्शन घेऊन अमळनेरात परतले होते. त्यानंतर ते मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. तेथे बिल भरण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातून त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला यात ऋषिकेश सोनार गंभीर जखमी झाला आहे. धुळे येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत आहे. तर तेजस पाटीलही जखमी झाला आहे. यात मुख्य आरोपी दादू पाटील हा असून त्याला नाशिक तेथील त्याचा मित्र दीपक बोरसे याच्याकडून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेऊन अमळनेर येथे आणले आहे. घटना कशी ?आणि नेमक्या काय कारणावरून घडली याची कसून चौकशी करीत आहेत. अमळनेर पोलिसांनी आता खाकीचा धाक उगारायला सुरुवात केली आहे.
या घटनेत आणखी कोणी आहेत का ? याचा सुद्धा तपास पोलीस करीत आहेत. तर जखमी हे शुद्धीवर आले नसल्याने घटनेचा सविस्तर उलगडा होण्यास अडचणी येत आहेत, ते शुद्धीवर आल्यावर खऱ्या घटनेचा उलगडा होईल, आणि बरीच माहिती पुढे येईल असे पोलिसानी पोलीस दक्षता लाईव्हच्या प्रतिनिधीस सांगितले. पोलिस निरीक्षक विजय शिंदे आणि पोलीस पथकातील योगेश महाजन, निलेश मोरे, घनश्याम पवार, गणेश पाटील यांनी कारवाई केली आहे.शहरात कोंबिंग ऑपरेशन पुन्हा व्हावे आणि अचानक फेरफटका पोलिसांनी मारावा अशी सुद्धा मागणी पुढे आली आहे ,पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या