Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमअमळनेरात दोन तरुणांचा खून...! आरोपींना ताब्यात द्या, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन, पोलीस तैनात

अमळनेरात दोन तरुणांचा खून…! आरोपींना ताब्यात द्या, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन, पोलीस तैनात

अमळनेर / धवल वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह:-जिल्ह्यात खून व फायरिंगच्या घटनांची मालिका सुरूच असून पोलीस प्रशासनाबद्दल प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.अमळनेर शहरात स्पिकरच्या आवाज कमी करण्यावरून झालेल्या वादातून चाकूने भोसकून तरूणाचा खून करण्यात आला तर दुसऱ्या घटनेत अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात दारूच्या नशेत असतांना झालेल्या वादात तरूणावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २४ एप्रिल रोजी रात्री घडली. या दोन्ही घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे,दरम्यान एका गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.मयत तरूणाचे नातेवाईक सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर उतरून मुख्य ठिकाणी रास्ता रोको करत जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केले. मारेकऱ्यांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी नातेवाईकांनी आवेशात केली. यावेळी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.

याघटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, पहिल्या घटनेत अमळनेर शहरातील दाजीबानगरात कार्यक्रमात सुरू असलेला लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या अगदी किरकोळ कारणावरून अक्षय राजू भील (२१) या तरूणावर सोमवारी २४ एप्रिल रोजी रात्री पाच ते सहा जणांनी चाकू भोसकून गंभीर जखमी केले होते. त्याला धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपाचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालविली, ही घटना ताजी असतांनाच दुसरी घटना घडली. यामुळे एकच खळबळ माजली, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावातील वैदूवाड्यात सोमवारी २४ एप्रिल रोजी मध्यरात्री रात्री एकच्या सुमारास नाना मंगलसिंग बारेला (२१) या तरूणाला वैयक्तिक वादातून संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला (२२) याने कुन्हाडीने सपासप वार करून नाना बारेला याचा खून केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव, पोलिस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांनी सावखेडा गावातील खून प्रकरणात संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला याला ताब्यात घेतले. या दोन्ही घटनेमुळे जळगाव जिल्हा तूर्त हादरला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पोलीस दलाची कुमक अमळनेर येथे मागविण्यात आली असून शहरातील काही भागात तणावपूर्ण व काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे..

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या