Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedअमळनेर तालुक्यातील जानवे येथे अपघात १ ठार...

अमळनेर तालुक्यातील जानवे येथे अपघात १ ठार…

अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.कारने दुचाकीला उडवल्याने एक जण ठार झाल्याची घटना दिनांक ४ रोजी दुपारी साडे तीन वाजता अमळनेर तालुक्यातील जानवे गावाजवळ घडली. याघटनेबाबत अधिक माहिती अशी की, डांगर कडे जाणाऱ्या मोटरसायकलला धुळ्याकडून येणाऱ्या चारचाकी एम एच १८, बी एक्स ची धडक लागल्याने डांगर येथील गोकुळ चतुर चव्हाण ( वय ४२) ठार झाल्याची घटना ४ रोजी दुपारी साडे तीन वाजता जानवे गावाजवळ घडली. मोटरसायकल आणि चारचाकीची धडक होताच मोटरस्यकलस्वार चार चाकीच्या काचेवर येऊन धडकला, चार चाकीचे पुढचे टायर फुटले. गोकुळ चव्हाण यांला जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहनाने धुळ्याला नेताना त्याचा मृत्यू झाला. उशिरा गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अमळनेर ग्रामीणचे पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या