Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या काठावर प्रेत आढळले; परिसरात खळबळ

अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या काठावर प्रेत आढळले; परिसरात खळबळ

अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणावर एका पुरुष जातीचे प्रेत वाहून आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळी अमळनेर पोलीस पथक दाखल झाले.मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या काठावर एक प्रेत कुजलेल्या अवस्थेत दिनांक २१ रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गुराख्याना दिसून आले. कुत्रे प्रेताचे लचके तोडत होते. गुराख्यानी पोलीस पाटील उमाकांत पाटील यांना कळविल्यानंतर त्यांनी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहा पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक व पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, सुनील तेली यांनी घटनास्थळी भेट दिली असता मयत पुरुषाच्या अंगावर कपडे नव्हते आणि त्याच्या शरीराला माश्यांनी खाल्ले होते. तो वाहून आलेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील तेली करत आहेत. अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ताडे यांनी घटनास्थळी जात पोर्टमार्टम केले व प्रेत वृध्द व्यक्तीचे असल्याचा निष्कर्ष व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत मारवड पोलिसांनी तेथेच प्रेतावर अंत्यसंस्कार केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या