Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमअमळनेर दंगल प्रकरणी पाच आरोपींना जामीन मंजूर

अमळनेर दंगल प्रकरणी पाच आरोपींना जामीन मंजूर

अमळनेर/धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर येथे मोठ्या प्रमाणात दंगल उसळली होती.वातावरण खूप चिघळले होते.संचारबंदी सुद्धा लागली होती.अमळनेर शहरातील येथील जिनगर गल्ली, पानखिडकी परिसरातील दंगलप्रकरणी पाच संशयित आरोपीना हायकोर्टाकडून जामीन मंजूर केला आहे. दोन महिन्यापासून जामिनाच्या प्रतिक्षेत होते.अमळनेर येथील जिनगर गल्ली, पानखिडकी परिसरातील दंगलप्रकरणी माजी नगरसेवक सचिन विभाकर उर्फ गोपी कासार, राकेश बारी, कुणाल भावसार, ईश्वर लांडगे, योगेश लांडगे यांना उच्चन्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. साधारण गेली 2 महिने जेलमध्ये असलेल्या या संशयित आरोपीना जामीन मिळाल्याचे वृत्त येताच त्यांचे नातेवाईक व समर्थक यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वी जिनगर गल्ली ते सराफबाजार पानखिडकी भागात किरकोळ कारणावरून दगडफेक होऊन 2 गटात दंगल झाली होती. यात पोलीस अधिकारी राकेश परदेशी यांच्यावर तलवार हल्ला होऊन अनेक पोलीस देखील जखमी झाले होते. यात इरफान बेलदार सह दोन्ही गटातील पन्नास पेक्षा अधिक आरोपी करण्यात आले आहे. काही जेलमध्ये तर काही अद्याप फरार आहेत. सदर आरोपींवर दाखल गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने गोपी कासार, राकेश बारी, कुणाल भावसार, व ईश्वर लांडगे, योगेश लांडगे यांना काल दिलासा दिला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या