Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअरे बापरे... ! ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आणखी १७ रुग्णांचा मृत्यू

अरे बापरे… ! ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आणखी १७ रुग्णांचा मृत्यू

ठाणे/प्रतिनिधी:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आणखी १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पाच रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.ठाण्यामधील कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्ण दगावले आहेत. या मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयात पाच रुग्ण दगावले होते. त्यानंतर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.कळवा रुग्णालयातील रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णालयाची क्षमता 1500 रुग्णांची आहे. पण रुग्णालयात रोज क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होत आहेत. पावसामुळे साथीच्या आजारामुळे ही संख्या अधिकच वाढली आहे. त्यातच डॉक्टर आणि परिचारिकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याचंही सांगण्यात येतं.मृत्यू झालेल्या 17 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. या दुर्दैवी घटनेने रुग्णांच्या नातेवाईक यांच्यात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या