अरे बापरे…! नशिराबादजवळील शेतात मानवी कवटी,हाडे सापडल्याने खळबळ…!
जळगाव/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- बापरे… !! सध्या जिल्ह्यात काही न काही घटना घडत आहेत,तर काही गुन्हे उजेडात येत आहेत..तर काही भीतीदायक आणि मन हेलावणारे प्रकार ही समोर येत आहेत..जळगाव तालुक्यातील नशिराबाद शेत शिवारातील एका शेतात मानवी कवटी व हाडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात शुक्रवार ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेली अधिकृत माहिती अशी की, नशिराबाद शिवारातील शेतात नारायण पाथरवट हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले गेले असता त्यांच्या शेताजवळ मानवी कवटी व हाडे आढळून आले.आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या संदर्भात त्यांनी तातडीने नशिराबाद पोलिसांना माहिती देऊन घटनेची माहिती दिली आणि सविस्तर आपबिती सांगितली. नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. यावेळी मानवी कवटीच्या बाजूला आधारकार्ड, सॅमसंग मोबाईल अशा वस्तू आढळून आल्या. त्यानुसार मयत व्यक्ती हा रामा उराव (वय ५२, रा. मोकार्या जि. लोहरदगा राज्य झारखंड) असे असल्याचे दिसून आले. नेमका हा प्रकार हत्या की घायपात हे काहीच समजू शकलेले नाही..या प्रकारणाची कसून चौकशी करण्यात येईल तेव्हाच माहिती हाती लागेल असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. या संदर्भात पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.
याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास मात्र सुरू असून या उघडकीस आलेल्या प्रकाराबाबत काहीशी चर्चा सुरू होती.