अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- म्हसवे गावाजवळ एकाला लुटल्याची घटना घडली आहे.जळगाव शहरातील मेहरूण भागातून अमळनेर येथे घरी जात असताना एका व्यक्तिला धरणगाव तालुक्यातील म्हसवे गावाजवळ अज्ञात दरोडेखोरांनी अडविले आणि डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने तीन वार करून गंभीर जखमी केले. तसेच त्याची दुचाकी आणि दोन लाख रुपये घेऊन पोबारा केला. या जबर दरोड्याप्रकरणी धरणगाव पोलीस तसेच एलसीबी पोलीस माहिती घेत आहेत. जखमीवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बबलू उर्फ राजेंद्र रमेश सूर्यवंशी (वय ३५, रा. ताडेपुरा, अमळनेर, हल्ली मु. मेहरूण असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. सेंट्रींग कामाची ठेकेदारी करून उदरनिर्वाह करतो. तो अमळनेर येथे त्याच्या घरी जाण्यासाठी मंगळवारी दि. २३ मे रोजी दुपारी १२ वाजेनंतर निघाला होता. त्याच्यासोबत अमळनेर येथील प्लॉट व्यवहाराचे दोन लाख रुपये होते. तसेच तिकडून परत येतांना त्याच्या पत्नीलाही तो सोबत घेऊन येणार होता.मात्र अज्ञात व्यक्तींनी मिरची पूड डोळ्यात टाकून त्याच्याकडचे पैसे लुटल्याची घटना घडली. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.