Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणअरे बापरे..! सूनसगावच्या सुदर्शन पेपर मिलला आग; लाखोंची हानी

अरे बापरे..! सूनसगावच्या सुदर्शन पेपर मिलला आग; लाखोंची हानी

नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ तालुक्यातील सुनसगाव गावाजवळील सुदर्शन पेपर मिलला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या घटनेने परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली.. जळगावहुन आग विझविण्यासाठी बंब पाचारण करण्यात आले होते. पाहता पाहता आगीचा विळखा संपूर्ण मिलमध्ये पसरल्यानंतर विविध भागात आगीचे लोण पसरल्याने कोट्यवधींची हानी झाली.आग विझवण्यासाठी भुसावळसह जळगाव जिल्ह्यातून अग्निशमन दलालाल पाचारण करण्यात आले आहे. सध्या उन्हाळ्याचा कडाका अधिकच वाढला असताना पेपर मिलला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्यासह तालुका पोलिसांनी धाव घेतली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत आगीचे कारण व नुकसानीचा आकडा समारे येणार आहे.पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या