जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव येथील अलफैज फाउंडेशन संचलित अलफैज उर्दू हायस्कूलमध्ये प्रवेशोस्तव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पुस्तक देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांना मनोरंजन करण्या साठी जम्पिंग, झोका आणि विविध प्रकारांचे खेळ आयोजित करण्यात आले होते. शाळेचे चेअरमन मुश्ताक सालार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनचे स्वागत आणि उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमास अलफैज शाळेचे मुख्याध्यापक पठाण आसिफ, अ.करीम सालार इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका नाजीया खान, के.जी विभागाचे प्रमुख समरीन शेख, अ. करीम सालार काॅलेजचे प्राचार्य मोहसीन शेख, सर्व शिक्षक बंधू भगिनी , पालक आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.