Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावअल्पवयीन चोरट्यांकडून सहा मोटारसायकली हस्तगत

अल्पवयीन चोरट्यांकडून सहा मोटारसायकली हस्तगत

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहर आणि परिसरातून विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या संशयित दोन अल्पवयीन मुलांना शहर पोलिसांनी एस एम आय टी कॉलेज परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या ६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जळगाव शहरासह इतर बाजारपेठ परिसरातून बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या दुचाकींची चोरी झाल्याचे प्रकार वाढत आहे. नागरिकांच्या दुचाकींची चोरी झाल्याचे प्रकार वाढत आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ, उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, पोलीस नाईक किशोर निकुंभ, गजानन बडगुजर, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण, रतन गीते,तेजस मराठे, योगेश इंदाटे,अमोल ठाकूर यांनी शुक्रवार १४ जुलै रोजी मध्यरात्री एस.एम. आय.टी कॉलेज परिसरात सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दरम्यान यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे,अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या