मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
जळगाव/ व्ही.धवलकुमार / पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात सर्रासपणे विविध प्रकारच्या चोरीच्या घटनेत वाढ झालेली दिसून येत आहे.अल्पवयीन मुलांच्या मदतीने मोबाईल लांबवणाऱ्या टोळीचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या चांगल्या कामगिरीबद्दल पोलिसांचे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या कारवाईत ४ संशयित आरोपी व ६ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल चोरीचे ४२ मोबाईल हस्तगत केले आहेत. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा आठवडे बाजार शिवकॉलनी आणि महाबळ परिसरातून अनुक्रमे ७ एप्रिल आणि १३ एप्रिल रोजी दोन जणांच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून लांबवल्याची घटना घडली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.याआधीही मोबाईल चोरी गेल्याचे गुन्हे दाखल आहेत.रूम करून राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांचे मोबाईल चोरीस गेलेले आहेत. दरम्यान पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंदनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यातील ४ संशयित आरोपी आणि ६ अल्पवयीन संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे.त्यांची कसून चौकशी केली आहे.ताब्यातील सर्व संशयित आरोपी हे झारखंड राज्यातील रहिवाशी आहेत अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडून चोरीचे तब्बल ४२ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी लहान बालकांना हाताशी घेऊन मोबाईल चोरी व जबरी चोरी करत असल्याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, पोलीस नाईक, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, चंद्रकांत पाटील, उमेश पवार, ईश्वर पाटील, अनिल सोनवणे, दीपक वंजारी, चालक संतोष पाटील यांनी कारवाई केली.
दरम्यान दिवसा काही संशयित तरुण कॉलनी परिसरात फिरत असतात तसेच रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी अशी अपेक्षा रहिवाशांकडून होत आहे.