Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमअल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार; एकास अटक

अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार; एकास अटक

पाचोरा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पाचोरा तालुक्यात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार व मारहाण करणाऱ्या रामेश्वर कॉलनीतील तरूणाला पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती. शनिवारी दुपारी २ वाजता त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोपाळ रामचंद्र माली (वय २८, रा. शांतिनारायण नगर, रामेश्वर कॉलनी परिसर, जळगाव) असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्याने पाचोरा तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले. २९ जून ते २० जुलै पावेतो संशयित गोपाळ माळी याने पीडित मुलीवर तिच्या घरी आणि पुण्यातील वाघोली येथे अत्याचार 1) केले. तसेच दारू पिऊन तिला मारहाण केल्याचे
पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पिंपळगाव पोलीस स्टेशनला तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित गोपाळ माळी याला पुणे येथून अटक करण्यात आली आहे. ईत्याला शनिवारी दुपारी २ वाजता जिल्हा न्यायालयात न्यायमूर्ती शरद पवार यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारतर्फे अॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या