Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमअवैध्य जनावरे वाहतूक गुन्ह्यामध्ये सापडलेली वाहने आता न्यायालय निकाल येईपर्यंत पोलीस ठाण्याच्या...

अवैध्य जनावरे वाहतूक गुन्ह्यामध्ये सापडलेली वाहने आता न्यायालय निकाल येईपर्यंत पोलीस ठाण्याच्या ताब्यात राहणार..

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

सोलापूर /जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील /पोलीस दक्षता लाईव्ह:- येथे मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी अवैध गोवंश व इतर जनावरांची वाहतूक होत असते,ती वाहने पोलिसांच्या मदतीने गोरक्षक ही वाहने अडवून रीतसर गुन्हा दाखल करतात, परंतु आतापर्यंत पोलिसस्टेशन मधील पोलीस निरीक्षक जनावरे गोशाळेत पाठवत होती व गुन्ह्या मधील वाहन हे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून त्या वाहन मालकास परत देत होती

ही बाब प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती सदस्य ( महाराष्ट्र शासन नियुक्त ) व ऍनिमल वेल्फेअर ऑफिसर ( मुंबई उच्च न्यायालय नियुक्त) केतनभाई शहा यांनी डी,सी,पी झोन विजय कबाडे यांच्या निदर्शनास आणून त्यांना विनंती केली की, ह्या अमुक वाहनातूनच वारंवार गुन्हे होत असतात. मुक्या जनावरांच्या कत्तली होत असतात.आपण ईतर गुन्ह्यात सापडलेल्या वस्तू जप्त करून ठेवता मग हे पण गंभीर फोजदारी गुन्हे आहेत. गुन्ह्यातील वाहन आपण सोडून दिल्यावर लगेचच पुन्हा दुसरे गुन्हे घडतात म्हणून एका पेक्षा जास्त वेळा जर त्याच क्रमांकाच्या वाहनावर गुन्हे दाखल झाल्यास त्या वाहनाचे रजिस्ट्रेशन आरटीओकडून रद्द झाले पाहिजे, वरील दोन्ही विनंती पोलीस प्रशासनाने मान्य करून ताबडतोब सर्व पोलीस स्टेशनला कार्यालईन आदेश काढला.


सर्व गोरक्षक,गोसेवक व प्राणीमित्रामध्ये समाधान व्यक्त करीत पोलीस प्रशासन व आर टीओ प्रशासनाचे आभार व्यक्त करीत आहेत,अश्या प्रकारचा आदेश ग्रामीण व संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस स्टेशनला डीआयजी कार्यालयातून निघण्यासाठी श्री. शहा हे प्रयत्न करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या