Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावअसोदा विद्यालयातर्फे राष्ट्रीय हरित सेनेतर्फे टाळ मृदुंगांच्या गजरात वृक्षदिंडी

असोदा विद्यालयातर्फे राष्ट्रीय हरित सेनेतर्फे टाळ मृदुंगांच्या गजरात वृक्षदिंडी

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव तालुक्यातील असोदा येथील सार्वजनिक विद्यालयातून राष्ट्रीय हरित सेनेतर्फे टाळ मृदुंगांच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. पर्यावरण विषयक घोषणा देऊन मुला-मुलींनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून जागृती केली. वृक्ष लागवड,प्लास्टिक मुक्ती याविषयी विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा केलेली होती.

वृक्षदिंडीचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्रीराम मंदिर संस्थेच्या भजनी मंडळातील ह.भ.प. डालेंद्र महाराज, धीरज महाराज, दिलीप महाराज,गोपाळ भोळे, गलू चौधरी,वासू चौधरी, गोविंदा सावदेकर,मुख्याध्यापक श्रीमती विद्या खाचणे, पर्यवेक्षक डॉ.मिलिंद बागुल विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. वृक्षदिंडीचे नियोजन हरीत सेनाप्रमुख गोपाळ महाजन यांनी केले. वृक्षदिंडीनंतर परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक सुनील चौधरी यांच्या हस्ते झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.चौधरी यांनी झाड पर्यावरण संतुलनसाठी कशा प्रकारे मदत करते या विषयी माहिती सांगितली. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावावे असे आवाहन मुख्याध्यापिका श्रीमती खाचणे यांनी केले. वृक्ष लागवडीचा व सहा महिन्यानंतर वृक्ष किती वाढलाय याचा फोटो माझ्या मोबाईलवर पाठवावा असे आवाहन हरित सेनेचे गोपाळ महाजन यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संचालक सुनील चौधरी मुख्याध्यापिका श्रीमती खाचणे पर्यवेक्षक डॉ.मिलिंद बागुल,एल.जे.पाटील, नरेंद्र भंगाळे, प्रेमराज बऱ्हाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ महाजन यांनी तर आभार सचिन जगले यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या