Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याआज या वर्षातील पहिले छाया चंद्रग्रहण; रात्री साडेचार तास चालणार.. !

आज या वर्षातील पहिले छाया चंद्रग्रहण; रात्री साडेचार तास चालणार.. !

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- निसर्गाची किमया ही अभूतपूर्व असते.आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. हे छाया चंद्रग्रहण आहे,ही एक अतिशय आकर्षक खगोलशास्त्रीय घटना घडणार आहे. आपली सौरमाला कशी कार्य करते आणि खगोलीय पिंडांच्या हालचालींबद्दल अधिक जाणून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे.अनेक खगोल शास्त्र अभ्यासक यांना उत्सुकता लागून आहे. चंद्रग्रहणाचे तीन प्रकार आहेत – पूर्ण चंद्रग्रहण, आंशिक चंद्रग्रहण आणि उपछाया चंद्रग्रहण. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या पातळ आणि बाहेरील भागातून जातो तेव्हा एक उपछाया ग्रहण होते. आजचे छाया चंद्रग्रहण हे या वर्षातील पहिले असणार आहे.

उपछाया चंद्रग्रहणाची वेळ अशा प्रकारे राहील.
विज्ञान आणि ज्योतिषशास्त्रानुसार, 2023 वर्षाचे पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी रात्री 8:45 वाजता सुरू होईल आणि रात्री 1:02 वाजता समाप्त होईल. हे ग्रहण साडेचार तास चालणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण हे छायाग्रहण असल्याने त्याचा सुतक कालावधी वैध ठरणार नाही. या दरम्यान, चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जाईल, ज्यामुळे चंद्रग्रहण होईल. पृथ्वीचा सापेक्ष आकार चंद्रापेक्षा मोठा आहे, म्हणजे त्याची सावली देखील नैसर्गिक उपग्रहापेक्षा खूप मोठी आहे. हे ग्रहण एकूण 4 तास 18 मिनिटे चालेल, असे ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या