Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणआनोरे येथील रामलीलेची भगवान नृसिंहाच्या मिरवणुकीने सांगता

आनोरे येथील रामलीलेची भगवान नृसिंहाच्या मिरवणुकीने सांगता

धरणगाव/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-तालुक्यातील आनोरे येथील तीन दिवशीय रामलीलेची सांगता आज सकाळी भगवान नृसिंहाच्या मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी “भगवान नृसिंह महाराज की जय” असा एकच जयघोष करण्यात येत होता. आनोरे येथे अक्षय तृतीयेला तीन दिवस रामलीला निघते. कोरोना काळ वगळता 3०० वर्षापासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. परिसरातील असंख्य खेळयातील प्रेक्षक रामलीला पाहण्यासाठी येत असतात. शेवटच्या दिवशी सकाळी भगवान नृसिंहाच्या मिरवणुकीने रामलीलेची सांगता होते. सुर्योदय होतांना भगवान नृसिंहाचे पात्र निघते. नृसिंह महाराजांना नारळ वाहण्यासाठी एकच गर्दी होत होती. मिरवणुकीत नृरसिंह महाराजांकडे मागितलेला नवस पूर्ण होतो, अशी श्रध्दा परिसरातील भाविकांची आहे. त्यामुळे नृसिहाच्या पात्राला नारळाचे तोरण चढविण्यासाठी महिलांची रिघ लागली होती. दरम्यान, नृसिंहाच्या पात्राचा मान माजी सैनिक जितेंद्र हिरामण खैरनार यांना मिळाला होता. त्यांच्याकडून गाव जेवण देखील देण्यात आले. आज या निमित्ताने तरुणाई मध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या