Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावआमदार भोळेंतर्फे नुकसानग्रस्तांना धान्य किट वाटप

आमदार भोळेंतर्फे नुकसानग्रस्तांना धान्य किट वाटप

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील मागील सात ते आठ दिवसापूर्वी जळगाव येथे झालेल्या पावसामुळे तांबापुरा व फुकटपुरा येथील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. याविषयी प्रशासनाला योग्य त्या मदतीचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. यावेळी फुल न फुलाची पाकळी म्हणून धान्याच्या किटचे वाटप केले. कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही कुटुंब म्हणून तुमच्या सोबत आहोत, असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. या प्रसंगी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, विनोद मराठे,दीपक बाविस्कर, मिलिंद सोनवणे,अबिद खान, भूषण लाडवंजारी, मधू भाऊ ढेकळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या