Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedआय. टी कंपनीत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; ७० जणांना...

आय. टी कंपनीत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; ७० जणांना फसविल्याचे उघड….!

पुणे/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- आय. टी कंपनीत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपीना गुन्हे शाखा युनिट-चार पिंपरी चिंचवडने अटक केले आहे. त्यात त्यांनी ६० ते ७० मुला-मुलींना फसवल्याचे उघड झाले. या गुन्ह्यात कमलेश पंढरीनाथ गंगावने, वय ४० वर्षे, रा- ११ साई अंगण सोसायटी, तापकीरनगर, काळेवाडी पुणे व त्यांचे इतर सहकाऱ्यांनी वेळोवेळी टेक्नालॉजी एस.ए.पी.एम.एम कंपनी आणि एम के मैनेजमेंट सर्व्हिस नावाने जॉबचे अँड देणाऱ्या कंपनीचे मालक महेशकुमार कोळी तसेच कंन्सल्टन्सी कल्पना मारुती बखाल, सुरज महाले, रा-चंदननगर, पुणे श्रावण शिंदे यांनी मिळून फिर्यादी तसेच त्यांचे इतर साथीदारांना अनुदिप शर्मा पशुपती याचे ई पेवेलिन कंपनी खराडी, पुणे पबैंक्यू सॉफ्टवेअर सिस्टम्स प्राव्हेट लिमिटेड, विमाननगर येथे बनावट आयटी कंपनीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ६० ते ७० मुला-मुलींची एकूण ५० लाख रुपये फोन पे गुगल पे आणि चेक व्दारे वेळोवेळी स्विकारुन अस्तित्व नसलेल्या बनावट कंपनीचे बनावट नेमणूक पत्र (अपॉर्टमेंट लेटर) देवून आर्थिक फसवणूक आणि विश्वासघात केला. यात भोसरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद होता. प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे व सदरच्या गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांना करण्याचे आदेशित केले होते. तेव्हा गुन्हे शाखा युनिटचे अधिकारी आणि अंमलदार यांनी या गुन्हयाचा तपास तात्काळ सुरु करुन शिताफीने पिंपरी चिंचवड परिसरातून आरोपी महेशकुमार हरिचंद्र कोळी, वय-३२ वर्षे, रा.५५ सुखनिवास सोसायटी, लडकत पेट्रोलपंपा जवळ, सोमवार पेठ, पुणे २) अनुदिप चंद्रकांत पशुपती ऊर्फ शर्मा, वय ५२ वर्षे. रा-लेन नंबर १२ श्री राम पी.जी. जवळ, कानदवेनगर, वाघोली, पुणे ३) महिला आरोपी नामे मारुतराव बखाल वय ३० वर्षे, रा-बाबर सोळंकी रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर-४०२ ए विंगए दत्त नगर कल्पना दिघी पुणे. ४) श्रावण एकनाथ शिंदे, वय-३२ वर्षे, रा. फ्लॅट नंबर -४ लिमकर बिल्डींग, अजमेरा सोसायटीजवळ, तुकारामनगर, वाघोली, पुणे यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.

आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान केलेल्या तपासात आरोपी क्र २ याने बनावट कंपनीचे बनावट नेमणूक पत्र (अपॉर्टमेंट लेटर) देवून तसेच आरोपी क्रमांक एक,तीन आणि चार यांनी आरोपी नामे अनुदिप शर्मा याची बनावट कंपनी असल्याचे माहित असुनही फिर्यादी तसेच त्यांचे इतर साथीदारांची आयटी कंपनीत नोकरीला लावतो असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दाखल गुन्हयाचा अधिक तपास गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शंकर आवताडे करत आहेत. अशा प्रकारे वरील आरोपीकडून नोकरीला लावतो असे सांगून अधिक कोणाची फसवणूक झालेली असल्यास गुन्हे शाखा युनिट-चार पिंपरी चिंचवड यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या