Thursday, September 18, 2025
police dakshta logo
Homeजळगावआरोग्य सेवा विभागातील ५० परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या बदल्या

आरोग्य सेवा विभागातील ५० परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्य शासनाच्या आरोग्य सेवा विभागातील आयुक्तालयातर्फे गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या मंगळवारी १३ रोजी करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील सुमारे ४५ ते ५० जणांचा समावेश असल्याची माहिती मिळत असून शहराजवळ असणाऱ्या मोहाडी स्त्री रुग्णालयात ५ परिचारिकांची बदली झाली आहे. सदर बदल्या संगणकीय ॲप प्रणालीव्दारे करण्यात आलेल्या आहे.बदली करण्यात आलेल्या कर्मचा-यास त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्याकरिता तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे आणि संबंधित कर्मचा- याने त्यांना दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरीत हजर होऊन त्याबाबतचा अहवाल सबंधित नियुक्ती प्राधिकारी आणि संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांना सादर करावा, आदेश पत्रात नमूद आहे. संचालक नितीन अंबाडेकर यांच्या सहीनिशी नियुक्तीचे पत्र संबंधित कर्मचारी, परिचारिकांना मिळाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या