सावदा ता.रावेर / प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- रावेर तालुक्यातील सावदा शहरातील बसस्थानकाजवळीलभारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळमुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून सुमारे २३ लाख रुपये खर्चून ११० फूट उंच तिरंगा उभारणीचे काम सुरू झाले आहे. सोमवार ०७ ऑगस्ट पासून या कामास सुरवात झाली आहे. युद्ध पातळीवर काम सुरू आहे. यावेळी शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख सुरज (बद्री) परदेशी, मनीष भंगाळे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता व्ही. के. तायडे, ज्यु इंजिनिअर हेमंत महाजन, फिरोज खान पठाण, शाम अकोले, बौद्ध युवा ट्रस्टचे वेडू लोखंडे, नाना संन्यास, वाघराज तायडे, प्रदीप करोशिया आदी उपस्थित होते. १५ ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होऊन येथे तिरंगा फडकेल, असे नियोजन करण्यात आले आहे.दरम्यान नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आ.पाटील यांच्या निधीतून ११० फूट उंच तिरंगा उभारणीचे काम सुरू….!
RELATED ARTICLES

