Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याइंग्रजी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल संजिदाबानो शेखचा गौरव

इंग्रजी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल संजिदाबानो शेखचा गौरव

पाचोरा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा या महाविद्यालयातील विद्यार्थिनी संजिदाबानो शेख प्रथम प्रयत्नात इंग्रजी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल धरणगावच्या कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.तिला पाचोरा येथे क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देवून सन्मानित करण्यात आले. प्रा.डॉ.अतुल सूर्यवंशी यांनी तिला मार्गदर्शन केले. संजिदाबानोने मनोगत व्यक्त करताना माझे गुरु डॉ .सूर्यवंशी आणि सगळे श्रेय माझे दादा दादी, काका, काकू यांना जातं, ते माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले म्हणून यश संपादन करू शकली असे म्हणाली. कार्यक्रमाचे आभार जाकीर शेख यांनी मानले. संजिदा शेख हिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी तिचे वडील जाकीर शेख आणि काका, जोया काजी, गौरव चौधरी, संजय चौधरी, अमोल महाले, मनीष चौधरी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या