Sunday, July 13, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedइंदापूर घटनेतील चारही मृतदेह सापडले; ७० तासानंतर शोध कार्य थांबवले

इंदापूर घटनेतील चारही मृतदेह सापडले; ७० तासानंतर शोध कार्य थांबवले

पुणे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र मधील पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये विहिरीचं काम सुरु असताना माती खाली पडून चार मजूर अडकले होते. त्या चारही मजुरांचे मृतदेह सापडले आहेत. पहिला मृतदेह तब्बल 65 तासांनी सापडला होता, त्यानंतर 2 तासाने आणखी दोन मजुरांचे मृतदेह सापडले आहेत. तब्बल 67 तासाने आणखी दोन मृतदेह सापडले. तर 70 तासांनंतर चौथ्या मजुराचाही मृतदेह सापडला आहे. त्यामुळे अखेरीस 70 तासांनंतर एनडीआरएफचं शोधकार्य थांबवण्यात आलं आहे.इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम करीत असताना मंळवार, १ रोजी मातीचा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत बेलवाडी गावातील चार मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले हाेते. आज (शुक्रवार) दुपारी चाैघा मजूरांचे मृतदेह हाती लागल्यानंतर ते थांबविण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या