Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावइंन्स्टाग्रामवर थोर महापुरुषाबद्दल अश्लील कमेंट; एकावर पोलिसात गुन्हा दाखल

इंन्स्टाग्रामवर थोर महापुरुषाबद्दल अश्लील कमेंट; एकावर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सोशल मीडियावर लोकांच्या भावना दुखवणारे कमेंट करून अशांतता पसरविणाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोर महापुरूषांच्या फोटोला आक्षेपार्ह कमेंट करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बुधवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता शिवाजी नगर हुडको येथे राहणाऱ्या एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी नगर हुडको परिसरात प्रशिक दिपक ससाने हा तरूण वास्तव्याला आहे. मंगळवारी १ ऑगस्ट रोजी तो त्यांच्या मोबाईलमध्ये इंन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असतांना एका अकाऊंटवर एक महापुरूषांबद्दलचा व्हिडीओ शेअर झालेला दिसला. या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये एका इंस्टाग्राम आयडीवरून तीन दिवसांपूर्वी थोर महापुरूषांबद्दल अश्लिल आणि आक्षेपार्ह कमेंट केल्याचे दिसून आले. प्रशिक ससाने याने लागलीच समाज बांधवांना सांगितले. अश्लिल भाषा केल्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होवून जातीय दंगल घडविण्याच्या हेतूनेच ही कमेंट केल्याचे लक्षात आल्याने समाज बांधवांनी बुधवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास केल्यानंतर कमेंट करणारा संबंधित व्यक्ती हा शिवाजीनगर हुडको येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ससाने याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या