Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याउद्योगपती कासट यांच्या कार्यालयाचे ग्रील तोडले ; चोरट्यांनी अडीच लाच लांबविले.

उद्योगपती कासट यांच्या कार्यालयाचे ग्रील तोडले ; चोरट्यांनी अडीच लाच लांबविले.

धरणगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील उद्योगपती कासट ग्रुप यांचे कार्यालयातील कॅबिनमधील २ लाख ६० हजाराची रक्कम रात्री चोरट्यांनी घेवून पोबारा केला. या वेळी त्यांना मज्जाव केला असता त्यांनी दगडफेक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे.येथील प्रसिद्ध उद्योगपती कासट ग्रुपचे संचालक अशोक व शरद कासट यांचे महामार्गालगत घर असून घराच्या आवारात त्यांचे व्यावसायिक कार्यालय आहे. ते विटभट्टीच्या व्यवसाया बरोबरच सरकारी कंत्राटदार आहेत. रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कार्यालयातील खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.कॅबिनमध्ये जावून ड्रॉवरमधील पैसे काढून चोरट्यांनी पोबारा केला. यात शरद कासट यांचे ४० हजार, शैलेश कासट यांचे १ लाख, आशिष कासट यांचे ७० हजार, अमर कासट ५० हजार असा एकूण दोन लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.या वेळी घराच्या गेट जवळ असलेल्या रखवालदाराला चाहूल लागली, त्यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यावर जोरदार दगड फेक केली. त्याने आरडा ओरड करताच घरातील सर्व जण जागे झाले. मात्र चोरटे पसार झाले. याप्रकरणी अनिल अशोक कासट यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल उमेश भालेराव हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या