मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇
जळगाव / कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे / पोलीस दक्षता लाईव्ह:- पती-पत्नी नातेसंबंध यावर भाष्य करणारा ,मनोरंजक कथा, खुसखुशीत संवाद आणि उत्तम स्टारकास्ट असलेल्या ‘ऊर्मी ‘ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ‘उर्मी ‘ हा चित्रपट १४ एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे समृद्धी क्रिएशनने ‘उर्मी’ चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. याबाबत जळगाव येथील अरोमा हॉटेल मध्ये पत्रकार परिषद झाली.
रावेर तालुक्यातील विटवे येथील डॉ. प्रवीण चौधरी चित्रपटाचे निर्माता,गीतकार आहेत. संगीतकार उत्पल चौधरी ,प्रमोद चौधरी आणि पवन जैन यांनी संयुक्तरित्या परिषदेत सविस्तर माहिती दिली.
चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई येथील मिनी गोवा, नाशिक येथील सपकाळ नॉलेज सिटी आणि ग्रॅंटीओ हॉटेल आदी ठिकाणी झाले आहे..चैताली प्रवीण चौधरी ह्या सहनिर्माती आहेत. राजेश जाधव यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन केले आहे. विजय गटलेवार आणि उत्पल चोधरी ( फैजपूर ) यांनी संगीत, अनंत कामत यांनी संकलन, कौशल गोस्वामी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत ,स्वप्निल बांदोडकर यांनी गाणी गायली आहेत.
चित्रपटात अभिनेत्री माझ्या नवऱ्याची बायको ,पोस्टर गर्ल फेम रसिका सुनील हिने कसदार अभिनय केला आहे. अभिनेत्री सायली संजीव, अभिनेता चिन्मय उदगीरकर, नितीश चव्हाण, माधव अभ्यंकर, सायली पराडकर, तृप्ती देवरे, संतोष शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट ऊर्मी या चित्रपटात असून ऋतुजा जुन्नरकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.तसेच जळगाव व धुळे येथील ९ ते १० पडद्यामागील कलाकार यात समाविष्ट आहेत.
रावेर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील डॉ.चौधरी यांनी हा मोठा चित्रपट निर्मिती करण्याचे धाडस केले असून त्यांचे कौतुक होत आहे.
‘उर्मी’ या चित्रपटात नाती, प्रामाणिकपणा, विश्वास, प्रेम, मैत्री हे बिंदू जोडत एक उत्तम प्रस्तुती कथा साकारली आहे. पती-पत्नी यांच्या नात्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे काय घडते ? असं चित्रपटाचे कथासूत्र आहे. नायकाचं वैवाहिक पटकथा, आयुष्य सुरळीत सुरू असताना आधीची प्रेयसी नायकाच्या आयुष्यात बाळासह परतते आणि तिचा दावा असतो की, जन्माला आलेलं बाळ नायकाचंच आहे. आता नायकाच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्यापासून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. या प्रश्नांची उत्तरं नितीश जाणून घेण्यासाठी तुम्हाला १४ एप्रिलला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा लागेल.
पत्रकार परिषदेत अनेक पत्रकारांची आवर्जून उपस्थिती होती.