Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमएटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या आरोपीस जेरबंद 

एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या आरोपीस जेरबंद 

सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील /पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूर जिल्हयात असलेले ए.टी.एम सेंटर मध्ये ए.टी.एम कार्डची अदलाबदली करून मोठया प्रमाणात नागरिकांची फसवणूक केली जात असल्याबाबत गुन्हे दाखल आहेत. त्याअनुशंगाने पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाळकर यांना गुन्हयांचा आढावा घेवून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशात केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर  यांना गुन्हयांचा अभिलेख तपासून कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुशंगाने पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व पथक यांनी ए.टी.एम सेंटरमध्ये ए.टी.एम कार्डची अदलाबदली करून नागरिकांना फसवून त्यांचे बॅंक अकाऊन्टमधून रक्कम काढणा-या आरोपींबाबत माहिती घेत असताना, सी.सी.टी.व्ही फुटेज याचे विश्लेषण केले त्यानंतर गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंद्रुप पोलीस ठाणे, गु.र.नं 57/2023, भादविक 420 प्रमाणे दाखल गुन्हयातील संशयित व्यक्ती हा सोलापूर शहरातील आसरा चौक परिसरातील अन्नपूर्णा स्विटमार्टच्या बाजूला असलेल्या बोळामध्ये थांबला आहे. त्याअनुशंगाने त्या ठिकाणी जावून त्याबाबत खात्री केली आणि संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने स्टेट बॅंक ऑफ इंडिया, ए.टी.एम संेटर, मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर येथे एका इसमास फसवूण त्याची नजर चुकवून ए.टी.एम कार्डची अदलाबदली करून व त्याच्या ए.टी.एमचा पीन नंबर चोरून पाहून त्याचे एका साथीदाराच्या मदतीने सदरचा गुन्हा केले असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवून आणखीन चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार बदलून आणखी 07 ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचे सांगितले. त्यावरून खालील प्रमाणे 08 गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे षाखेचे पोलीस उप निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, यश देवकते, समर्थ गाजरे, विनायक घोरफडे, चालक प्रमोद माने यांनी बजावली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या