Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमएमआयडीसीच्या प्रांजल इंडस्ट्रीजमध्ये चोरी; गुन्हा दाखल

एमआयडीसीच्या प्रांजल इंडस्ट्रीजमध्ये चोरी; गुन्हा दाखल

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील एमआयडीसीतील एस सेक्टरमधील – प्रांजल इंडस्ट्रीज प्लॅस्टिक कंपनीतून ३६ हजार ५०० रुपये किमतीचे ईलक्ट्रीक मोटार व साहित्य चोरून नेल्याची घटना समोर आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय सिताराम प्रजापती ( वय ३३ रा. रायपूर कुसुंबा ता. जि. – जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती वरून, एमआयडीसी परिसरातील सेक्टर-एस मधील प्रांजल इंडस्ट्रीज प्लास्टिक दाना प्लांट कंपनीच्या मोकळ्या जागेतून संशयित आरोपी विजय प्रजापती याने १६ जून रोजी सकाळी १० वाजता १८ हजार रुपये किमतीची मोटार, प्लास्टीक कटर करणारे लहान व मोठे कटर असा एकुण ३६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीतील प्रमोद मराठे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी १८ जून रोजी दुपारी १२ वाजता विजय प्रजापती यांच्या विरोधात तक्रार दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी पठाण हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या