Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावएमआयडीसीच्या सुप्रिम कॉलनीत चॉपर घेऊन फिरणाऱ्यास अटक

एमआयडीसीच्या सुप्रिम कॉलनीत चॉपर घेऊन फिरणाऱ्यास अटक

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव-एमआयडीसी भागातील सुप्रिम कॉलनी परिसरात हातात लोखंडी चॉपर घेवून नागरिकामध्ये दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपी पिण्याला एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री ८ वाजता सुप्रिम कॉलनीतून अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी चॉपर हस्तगत केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर उर्फ पिण्यात रोहिदास चव्हाण (वय-२२) रा. मच्छी मार्केट,सुप्रिम कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. फिरण्यास मनाई असतांना शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील दिनकर उर्फ पिण्या हा हातात लोखंडी चॉपर घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गिरासे यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी १६ जून रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे शोध पथकाने कारवाई करत संशयित आरोपी पिण्या उर्फ दिनकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी चॉपर हस्तगत केला आहे. संशयित आरोप दिनकर उर्फ पिण्या याच्यावर यापुर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. दरम्यान याबाबत पोलीस कॉन्स्टेबल ललिल नारखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या