Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमएरंडोल तालुक्यातील रवंजेत दोन गटात तुफान हाणामारी; एकाचा मृत्यू

एरंडोल तालुक्यातील रवंजेत दोन गटात तुफान हाणामारी; एकाचा मृत्यू

एरंडोल/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे दोन गटांमध्ये शुक्रवारी दि. ७ जुलै रोजी जबर हाणामारी झाली आहे. हाणामारीत शस्त्रांचा वापर होऊन एक जण मयत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे तर आणखी एकाच्या हाताला जखम झाली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला सकाळी सुनील उर्फ आनंदा माळी याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला असून दुपारी नामदेव कोळी याच्या खुनाचा गुन्हा देखील दाखल झाला आहे.

नामदेव उर्फ रावण अशोक कोळी (२०) हा रवंजे गावात आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यासह राहतो. गावातीलच लक्ष्मण गोविंदा माळी (वय ४३) व सुनील उर्फ आनंदा गोविंदा माळी (वय ३८) यांच्या सोबत त्याचे एक दिवस आधी झालेल्या वादाच्या कारणावरून पुन्हा शुक्रवारी सकाळी रवंजे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ किरकोळ कारणावरून वाद झाला आणि यापूर्वीच्या वादाची खुन्नस डोक्यात ठेवून नामदेव कोळी याने सुनील माळी याला धारदार शस्त्राने पोटात वार करून गंभीर जखमी केले. सुनील माळी याला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या लक्ष्मण माळी याच्यावर देखील नामदेवने वार केला. तो वार त्याच्या हाताला लागला आहे. लक्ष्मण हा देखील गंभीर झाला. त्यावेळी नामदेव कोळी हा पळून गेला. मात्र भैया सोमनाथ कोळी याने त्याला पकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणले. त्याच वेळेला लक्ष्मण माळी, राजू माळी, सुकलाल माळी यांनी नामदेव कोळी याला देखील लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच, राज माळी याने त्याला दगड उचलून डोक्यात मारले. त्यामुळे तो गंभीर झाला. घटना नामदेवच्या आई, वडिलांनी, दोन्ही भावांनी पाहिली. तसेच, नामदेवची दुचाकी (एमएच १२-९५८१) हिला भय्या सोमनाथ कोळी याने पेटवून दिले. घटनेतील नामदेव आणि सुनील या दोघांना एरंडोल रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तेथून जळगाव शासकीय रुग्णालयात रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र नामदेव कोळी याचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे.जखमीवर उपचार सुरु आहेत.रुग्णालयात गर्दी झाली होती. पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या