Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233 वर; 900 प्रवासी जखमी

ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233 वर; 900 प्रवासी जखमी

खरगपूर ओडिशा- ( वृत्तसंस्था ) ओडिशातील बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 900 लोक जखमी झाले आहेत. हा आकडा वाढतच चालला आहे. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले.अत्यंत भयानक हा अपघात मानला जात आहे.गाडीचे चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण 15 डब्बे पटरीच्या बाहेर होते. कालपासून सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही सुरूच आहे.

भारतीय रेल्वेने जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रेन क्रमांक १२८४१ चेन्नई सेंट्रल ते शालीमारला जात होती. 2 जून रोजी दुपारी 3.30 वाजता ती शालिमारकडे निघाली. खरगपूर विभागातील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ रात्री 8.30 वाजता रेल्वे रुळावरुन घसरली. कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानंतर मालगाडीला धडकले, त्यामुळे मालगाडीही अपघाताच्या कचाट्यात आली. अपघात झाला तेव्हा सुरुवातीला या अपघातात 50 ते 70 लोक दगावल्याची माहिती समोर आली होती. रात्री उशिरा हा आकडा 120 वर पोहोचला. तसेच जखमींचा आकडाही 350 वर गेला. मात्र, सकाळपर्यंत मृतांचा आकडा 233 आणि जखमींचा आकडा 900 झाला आहे. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या अप आणि डाऊन अशा दोन्ही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. येथे मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ओडिशा सरकार मदतीसाठी जनरेटर आणि दिवे घेऊन अपघातस्थळी पोहोचले होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या