Sunday, July 13, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedऔरंगाबाद लेवा पाटीदार मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर व गुणवंतांचा सत्कार समारंभ ६...

औरंगाबाद लेवा पाटीदार मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर व गुणवंतांचा सत्कार समारंभ ६ ऑगस्टला

छत्रपती संभाजीनगर/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- छत्रपती संभाजीनगर येथील लेवा पाटीदार मित्र मंडळ व लेवा पाटीदार महिला मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे रक्तदान शिबिर व समाजातील दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम ६ ऑगस्ट रोजी सौभाग्य मंगल कार्यालय एन-११ हुडको येथे घेण्यात येणार आहे .रक्तदान शिबिर दुपारी 3 ते 5 वाजेच्या दरम्यान घेण्यात येणार आहे व सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान समाजातील दहावी तसेच बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे,असे मंडळाचे अध्यक्ष मधुकर सरोदे यांनी कळविले आहे. रक्तदान शिबिरामध्ये समाजातील बंधू व भगिनींनी जास्तीत जास्त संख्येमध्ये रक्तदान करावे,असे आवाहन सरोदे यांनी केले आहे. तसेच सर्व समाज बांधवांनी आपापल्या पाल्याचे 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेले (वर्ष 2022-23) 60% किंवा 60% च्यावर ज्यांना गुण असतील त्यांनी मार्कशीटची झेरॉक्स कॉपी खालील व्यक्तीकडे जमा करावी. भागवत फालक.मोबाईल नं. 9405109716, बलवंत नेमाडे, 9730297267, अनिल भंगाळे (बजाज नगर) 9922145699, श्रीमती उषा भंगाळे 9767996302 असे कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या