Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeजळगावकचरा वेचणाऱ्या महिलांना रेशन कार्ड मिळण्यासाठी 'सुधर्मा' संस्थेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कचरा वेचणाऱ्या महिलांना रेशन कार्ड मिळण्यासाठी ‘सुधर्मा’ संस्थेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील मेहरूण तांबापुरा परिसरातील कचरा वेचक महिलांना रेशन कार्ड नसल्यामुळे रेशन मिळत नाही, यासाठी त्यांचे सर्व कागदपत्र जमवून एक निवेदन सुधर्मा संस्थेच्यावतीने जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले. यावेळी सर्व कचरा वेचक महिला उपस्थित होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची व्यथा जाणून घेतली. सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी सांगितले की, या सर्व महिला कचरा वेचून उदरनिर्वाह करतात. त्यांचे रोजचे उत्पन्न अत्यंत अल्प आहे. त्यांना रेशन कार्ड नसल्यामुळे रेशन मिळत नाही.आपण स्वतः लक्ष घालून यासाठी मदत करावी अशी विनंती केली असता श्री.प्रसाद यांनी लगेचच तहसीलदारांना फोन करून याची माहिती दिली. त्यांना जाऊन भेटा..तुमचे काम नक्की होईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी एकूण १३ महिला उपस्थित होत्या. सुधर्माचे सूर्यकांत हिवरकर, नितीन तायडे, यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या