मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह..
सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:-फिर्यादी गुरुपाद पांडु डांगे (वय वर्षे 45 ),राहणार कणबस,तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीसात दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक 24 मार्च रोजीचे सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून ते दिनांक 25 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस शिवारातल्या तलावातील फिर्यादीचे 17 हजार 500 रुपये किंमतीचे एक लक्ष्मी कंपनीची साडेसात एच.पी.ची पाणबुडी मोटार कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून,मुद्दाम लबाडीने चोरून नेला होता.म्हणुन फिर्यादीने अज्ञात चोरटया विरूध्द वळसंग पोलिसात फिर्याद दिली होती.सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजशेखर निंबाळे हे करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अनंतकुमार परमेश्वर चौगुले,नागनाथ परमेश्वर चौगुले,रा.इंगळगी,तालुका दक्षिण या दोन आरोपींनी चोरल्याची माहिती मिळाली.त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता दोघांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.सदर गुन्ह्यातील पाणबुडी मोटार जप्त करण्यात आली आहे.दोन्ही आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल सनगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजशेखर निंबाळे हे करीत आहेत.