Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeक्राईमकमलापूरजवळ झालेल्या अपघातात अंत्रोळी येथील एकजण ठार

कमलापूरजवळ झालेल्या अपघातात अंत्रोळी येथील एकजण ठार

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह..

सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:-मिरज-सांगोला या राष्ट्रीय महामार्गावरील कमलापूर गावाजवळ अज्ञात पिकअप वाहनाने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने भीमराव लक्ष्मण करपे हे ठार झाले.तर शंकर मच्छिंद्र चौगुले हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील भीमराव करपे हे मंगळवेढा येथील नातेवाईक शंकर चौगुले यांच्या मालकीच्या मोटारसायकलवरून कवठेमहंकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा यात्रेला गेले होते.तेथून परत आपल्या गावी येत असताना मिरज-सांगोला राष्ट्रीय महामार्गावरील कमलापूर या ठिकाणी अज्ञात पिकअप वाहनाने त्यांना पाठीमागून धडक दिली.त्यात भीमराव हे जागीच ठार झाले.तर शंकर हे गंभीर जखमी झाले असून सांगोला येथील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.याबाबत दादासाहेब लक्ष्मण करपे यांनी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध फिर्याद दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या