कल्याण/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-: कल्याण भिवंडी महामार्गावरील गोवे गावच्या हद्दीत जय मल्हार हॉटेल (ढाबा ) परिसरात कोनगाव पोलिसांच्या पथकाने सापळा रचून पिस्तूल आणि काडतुसेसह एका गुन्हेगाराला गजाआड करण्यात यश आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शहजाद हिरा खान ( वय ४०, रा. एपीएमसी, भाजी मार्केट वाशी) ) असे अटक गुन्हेगाराचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. मागील महिन्यातही एका गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आले होते. कल्याण पोलीस पूर्णपणे कसून चौकशी करत आहे.
कल्याण भिवंडी मार्गावर पिस्तूल आणि जिवंत काडतुसेसह गुन्हेगार गजाआड
RELATED ARTICLES