Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकानळदानजीकच्या अपघातात तरुणीचा मृत्यू

कानळदानजीकच्या अपघातात तरुणीचा मृत्यू

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव तालुक्यातील कानळदा गावाजवळील समर्थ शाळेनजीक झालेल्या विचित्र आणि भीषण अपघातात अनोळखी तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.या प्रसंगी घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती, तर दुचाकीवरील दोन जण तसेच रिक्षातील चालक व चार महिला प्रवाशी जखमी झाल्याची घटना सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना खासगी आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ करण्यात आले आहे.

जळगाव ते कानळदा रस्त्यावरील समर्थ शाळेजवळ सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता विचित्र अपघात झाला. महेश गोकूळ जोशी रा. पिंप्री ता.धरणगाव हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीवाय ९९०३ ) ने कानळदा रोडवरून जळगाव शहराकडे येत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत दुचाकीवर अनोळखी महिला आणि २२ वर्षीय तरूणी बसलेले होते. कानळदा गावाजवळील समर्थ शाळेसमोरून जात असतांना वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला कट मारला. यात दुचाकीस्वार महेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तिघे रस्त्यावर फेकले गेले. तेवढ्यात जळगाव शहराकडून येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ८०७०) ने रोडवरील तिघांना चिरडले आणि रिक्षा देखील पलटी झाली. या रिक्षातील प्रवाशी विमल चौधरी, मंगलाबाई चौधरी, सुनिता चौधरी, राधाबाई चौधरी आणि रिक्षा चालका रविंद्र भावलाल पाटील सर्व रा. जळगाव हे जखमी झाले आहेत. यावेळी रस्त्यावर विचित्र अपघात झाल्याने काही वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती. खासगी वाहनातून दुचाकीवरील तीनही जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुचाकीवरील तिघा जखमींपैकी अनोळखी तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार महेश जोशी आणि अनोळखी महिला यांची प्रकृती मात्र गंभीर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या