Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकाळ्या बाजारात जाणाऱ्या गॅस हंड्या जप्त; कामती पोलिसांची कामगिरी

काळ्या बाजारात जाणाऱ्या गॅस हंड्या जप्त; कामती पोलिसांची कामगिरी

सोलापूर /जिल्हा प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोहाळे शिवारातील हॉटेल शिवराज पॅलेसच्या आवारात कंटेनरमधून सिलेंडर टाक्यांमध्ये चोरून गॅस भरून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना कामती पोलिसांनी रंगेहात पकडले. यात तुकाराम हनुमंत नाईकनवरे वय ३५ हॉटेल चालक रा. सोहाळे तसेच संजय मोहन पाटील वय ३६ ड्रायव्हर रा. डोंगरगाव ता. मंगळवेढा या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असल्याचे कामती पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी सांगितले. डुणगे यांना मंगळवार दिनांक ११ रोजी त्यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सोलापूर ते मंगळवेढाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सोहाळे शिवारात असणारे हॉटेल शिवराज पॅलेसचे आवारात कंटेनर क्रमांक एम.एच.२५ ए. वाय. ५१८६ मधून सिलेंडर टाकीमध्ये चोरून गॅस भरून तो काळ्या बाजारात विक्री करण्याकरिता जात असताना दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक कॅप्सूल आकाराचा गॅस भरलेला कंटेनर, रिकाम्या तसेच भरलेल्या टाक्या आणि इतर साहित्य असे ६० लाख २६ हजार ३६९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे,अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, सोलापूर ग्रामीण विभागाचे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस नाईक भरत चौधरी, अमोल नायकोडे, सचिन जाधवर, निशिकांत मेळे, हरिदास चौधरी, प्रथमेश खैरे यांनी पार पाडली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या