Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमकासेगाव येथील चोरीस गेलेल्या शेतातील ५ मोटार हस्तगत ; सोलापूर तालुका पोलिस...

कासेगाव येथील चोरीस गेलेल्या शेतातील ५ मोटार हस्तगत ; सोलापूर तालुका पोलिस ठाण्याची दमदार कामगिरी

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

सोलापूर /जिल्हा प्रंंतिनीधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव:-दिनांक ०४ मार्च रोजी रात्रौ ०९.३० वा. सुमारास सुशिलकुमार अंकुश जाधव (रा.कासेगाव ता.द.सोलापूर) यांचे कासेगाव शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी सामाईक विहिरी मधील पाणी उपासा करण्यासाठी 9 एच.पी.ची पानबुडी इलेक्ट्रीक मोटार अज्ञात ३ इसमांनी चोरी करून फिर्यादीची चाहुल लागताच पानबुडी इलेक्ट्रीक मोटार व अज्ञात इसमांनी त्यांचे सोबत आणलेली गॅस्ट्रो मोटार सायकल जागेवरच टाकुन देऊन पळुन गेले आहेत.अशा आशयाच्या फिर्यादी वरून तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयातील अज्ञात संशयित आरोपी यांचे शोधार्थ सोलापूर तालुका पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना गोपनिय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्हा हा तुळजापूर येथील एका संशयित इसमाने केल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या बातमीनुसार संशयित इसमाचा काटगाव ता. तुळजापूर येथे जाऊन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केले असता त्यांने सुरुवातीस उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेऊन त्याचेकडे तपास केला असता त्यांनी त्याचे इतर ३ साथीदारांसह गुन्हा केला असल्याची कबुली दिली.पोलीस ठाणे कडील दाखल असलेल्या ४ गुन्हयाची कबुली दिल्याने त्याचे कडुन एकूण २५ हजार रुपये किंमतीच्या ४ पानबुडी मोटार हस्तगत केल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस उपनिरीक्षक सुरज निवाळकर,पोना / शशीकांत कोळेकर,पोलीस अंमलदार / पैंगबर नदाफ,फिरोज बारगीर,महादेव सोलकर,वैभव सूर्यवंशी व सायबर पोलीस ठाणे कडील धीरज काकडे यांनी बजावल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या