Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईमकिराणा मालाची दुकानातून परस्पर विक्री करणाऱ्या आरोपीला पुण्यात अटक : कारागृहात रवानगी

किराणा मालाची दुकानातून परस्पर विक्री करणाऱ्या आरोपीला पुण्यात अटक : कारागृहात रवानगी

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-जळगाव येथील एका किराणा दुकानात काम करणा-या नोकराने दुकानातील माल परस्पर विक्री केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला असून गुन्हयातील आरोपी नोकरास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशाल शरद पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो (मेहरुण) जळगाव येथे राहत होता.

रामेश्वर कॉलनी परिसरात नंदकिशोर शिंदे यांचे किराणा दुकान असून त्यांच्या दुकानावर विशाल शरद पाटील हा कामाला होता. काही दिवसांपासून विशाल  दुकानातील सामान परस्पर विकत असल्याचा संशय दुकानदार शिंदे यांना होता. त्यानुसार आरोपी विशाल याने दुकानातील गेल्या सहा महिन्यांपासून 5 लाख 69 हजार 530 रुपये किमतीचा सामान विकल्याचे उघड झाले. याप्रकरणी 15 मार्च रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी विशाल याने किराणा सामान विकून मिळालेल्या रकमेपैकी त्याच्यकडून 30 हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशाल पाटील हा पुणे येथे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजली. त्या माहीतीच्या आधारे त्यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पोलिस नाईक सुधीर सावळे, इमरान सैय्यद, योगेश बारी, सचिन पाटील, पो. कॉ. साईनाथ मुंडे यांनी त्याला पुणे येथे अटक केली. व तेथून त्याला जळगाव येथे आणण्यात आले. त्याला न्या.श्रीमती जे.एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सुरुवातीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयीन कामकाज ॲड.स्वाती निकम यांनी पाहिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या