Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमकुरियरने तलवार मागवणाऱ्या पिता-पुत्राला पोलिसांनी घेतले ताब्यात....!

कुरियरने तलवार मागवणाऱ्या पिता-पुत्राला पोलिसांनी घेतले ताब्यात….!

अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अचंबित घालणाऱ्या अनेक घटना घडत असतात.एका गुन्हेगाराने चक्क कुरियरने तलवार मागवली. या तलवार मागवणाऱ्या अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील पिता-पुत्राला पोलिसांनी तलवार सह रंगेहात पकडून अटक केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शहरात एकाने तलवार मागवल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, हेडकॉन्स्टेबल शरद पाटील, रवींद्र पाटील, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे, यांना दुपारी दोन-अडीच वाजेच्या सुमारास अर्बन बँकेच्या जवळ नाकाबंदी लावली. दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी स्टेशन रोड कडून मोटरसायकल (क्रमांक एम एच १५ जी क्यू ५९०४) वर अदनान सादिक खाटीक (वय १९ रा.मिलन चिकन, लक्ष्मी टॉकीज मागे गांधलीपुरा) हा पांढऱ्या पोतडीत झाकून तलवार आणताना आढळून आला.त्याची बारकाईने तपासणी केली. त्याची विचारपूस केली असता अदनान याने वडील सादिक सुपडू खाटीक (वय ४७) यांच्या नावाने तलवार मागवल्याचे स्पष्टपणे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक करून शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक चौकशीसाठी पोलिसांनी अदनान खाटीक याची मोटर सायकल आणि भ्रमणध्वनी असा एकूण एक लाख १२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या