Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमकुर्बानीच्या बकऱ्यावरून मीरा-भाईंदरमध्ये वाद; ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कुर्बानीच्या बकऱ्यावरून मीरा-भाईंदरमध्ये वाद; ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई-मीरा-भाईंदर येथील हाय सोसायटी परिसरात बकऱ्याच्या कुर्बानीवरुन मोठा वाद झाला. मंगळवारी संध्याकाळी या वादाची सुरुवात झाली. आतापर्यंत 35 ते 40 जणांविरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात FIR दाखल झाला आहे.

जे.पी. इन्फ्रा सोसायटीच्या एस्टेला बिल्डिंग परिसरात राहणाऱ्या मोहसीन खान नावाच्या व्यक्तीला बकऱ्याची कुर्बानी द्यायची होती. पण हिंदू संघटना आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर त्याला आपली योजना बदलावी लागली. बुधवारी 28 जूनला पहाटे 4 च्या सुमारास बिल्डिंगमधून दोन्ही बकऱ्यांना बाहेर नेण्यात आलं. मोहसीन खानची बायको यास्मीनने काशीमीरा पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर नोंदवल्यानंतर तणाव पुन्हा एकदा वाढला. यास्मीनने सोसायटीच्या 8 जणांविरोधात एफआयआर नोंदवली. त्याशिवाय 35 ते 40 अज्ज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच, मीरा-भाईंदर पोलिसांनी तात्काळ पावल उचलली. प्राण्याला आणून त्याला कापणं सोसायटी नियमात बसत नाही, हे मोहसीनला पोलिसांनी समजावलं. सगळ्यांचा विरोध आणि समजवाल्यानंतर अखेर मोहसीन बकऱ्याला बिल्डिंगच्या बाहेर घेऊन गेला. बकरा ठेवण्यासाठी सोसायटीकडे जागा मागितली होती. पण सोसायटीने परवानगी दिली नाही. त्यामुळे नाईलाजाने घरी बकरा आणावा लागला, असं यास्मीनने म्हटलं आहे. मंगळवारी सकाळी पहाटे चारच्या सुमारास माझे पती मोहसीन दोन बकरे घेऊन घरी आले, असं यास्मीनने एफआयआरमध्ये म्हटलं आहे. यास्मीनने ते दोन्ही बकरे आपल्या बाल्कनीमध्ये बांधले. त्यानंतर कपडे खरेदी करण्यासाठी म्हणून यास्मीन पतीसोबत गेली. रात्री 8.30 च्या सुमारास घरी आलो, त्यावेळी आपली गाडी रोखून वॉचमनला गाडीची तपासणी करण्यास सांगण्यात आलं. नवरा मोहसीनला धक्का-बुक्की झाली. दहशवतादी सुद्धा म्हटलं, असं यास्मीनने तिच्या FIR मध्ये म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या